Breaking News

मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा - दादासाहेब खेडकर


मातोश्री अकॅडमी सिबिएसी स्कूलमध्ये कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. मायमराठीचा ईतिहास फार जुना आहे. अनेक साहित्यिक, लेखक, कवी, कांदबरीकार, या मराठी भाषेने या महाराष्ट्राला दिले आहेत. वि.स. खांडेकर, वि.वा. शिरवाडकर, गो.ग. आगरकर, संत बहीनाबाई, या कवी व साहित्यिकांमुळे मराठी भाषेला वैभव प्राप्त झाले आहे. मराठी साहित्यातील उत्कृष्ट समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार कविवर्य कुसुमाग्रज यांना मिळाला त्यांचा पहिला काव्यसंग्रह जीवनलहरी होता. तर विशाखा हा काव्यसंग्रह कविवर्य वि.स. खांडेकर यांच्या स्वखर्चाने प्रकाशित झाला. ही कुसुमाग्रज यांच्या कार्याची पावती होती. त्यांनी वैष्णव ही कादंबरी तर दुरचे दिवे हे नाटक प्रथमतः लिहिले. मातोश्री शिक्षण संस्था अध्यक्ष मा. किशोर दराडे यांनी पुस्तकांचे शहर हा उपक्रम राबवून अनेक विद्यार्थ्यांना मदत करणार असल्याचे सांगितले प्रास्ताविक रिमा शेजवळ यांनी तर संगित शिक्षक तूषार सोनवणे यांनी मायमराठीवर कविता सादर करुन उपस्थितीत विद्यार्थ्यांना मंञमुग्ध केले. आभार वैशाली टर्ल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिमा पठाण, कल्याणी सांगळे, अमित खरोटे, रविंद्र जायभावे, शाम रोकडे, राणी ठाकरे, गणेश खांदवे यांनी परीश्रम घेतले.