Breaking News

जवळका सटवाई येथे शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम


जामखेड / ता. प्रतिनिधी । 23 ःतालुक्यातील जवळका सटवाई या दोन जिल्हयाच्या सरहद्दीवर असणार्‍या गावात शिवजन्मोत्सव सोहळा संदीप महाराज कदम यांच्या व्याख्यान व ह. भ. प. अच्चुत महाराज घोडके नेकनूर यांच्या किर्तनाने उत्साहात साजरा करण्यात आला. जामखेड पासुन साधारण 26 कि.मी अंतरावर उस्मानाबाद व सोलापूर जिल्हयाच्या सरहद्दीवर असणार्‍या सटवाई जवळका या सटवाई मातेच्या पावणभुमीमध्ये दि. 22 रोजी सायंकाळी 7 वाजता शिवजन्मोत्सव सोहळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पृथ्वीराज वाळुंजकर, युवा नेते संतोष वाळुंजकर यांच्यासह ग्रामस्थांच्या पुढाकाराने साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमासाठी शिवव्याख्याते संदीप महाराज कदम, किर्तनकार ह.भ.प अच्चुत महाराज घोडके, नेकनूर यांच्यासह सकल मराठा समाजाचे मंगेश आजबे, शिवसेना तालुकाप्रमुख शहाजी राजेभोसले, हर्षद मुळे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन जवळका ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मैदानात करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांसह व्याख्याते व किर्तनकार यांचा सन्मानपुर्वक सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतीमेचे पुजन तसेच जिजाऊंना वंदन करून संदीप महाराज कदम यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनावरील व्याख्यान घेण्यात आले. व्याख्याते कदम यांनी आपल्या पहाडी आवाजाच्या शैलीत छत्रपती शिवाजी राजांच्या जिवनावरील मार्मिक प्रबोधन करून उपस्थित शिव भक्ताच्या टाळ्यांसह घोषणांचा प्रतिसाद मिळवला. व्याख्यानानंतर ह.भ.प अच्चुत महाराज घोडके नेकनूर यांचे कीर्तन घेण्यात आले. अशा एका वेगळ्या पद्धतीने येथे शिवजन्म उत्सव साजरा झाला. या कार्यक्रमासाठी उपसरपंच बब्रुवान वाळुंजकर, भाऊसाहेब दळवी, पप्पू बोराडे, हनुमान दळवी, गणराज वाळुंजकर, दत्तात्रय माने, सागर मंडलिक, लहानाजी वाळुंजकर, दत्तात्रय वाळुंजकर, भाऊसाहेब माने, पंडित बनसोडे, प्रवीण साळवे, दादा शेख, नवनाथ बोराडे, राधाकृष्ण वाळुंजकर, बाळासाहेब साठे, राम बोराडे यांच्यासह सर्व जवळका येथील अबालवृद्धांसह शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष वाळुंजकर यांनी तर, आभार पृथ्वीराज वाळुंजकर यांनी मानले.