रणजी सामन्यांचे आयोजन तटस्थ स्थळी
बंगळुरू, दि. 30 - भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या अध्यक्षतेखालील बीसीसीआयच्या तांत्रिक समितीने आगामी सत्रात सर्व रणजी सामन्यांचे आयोजन तटस्थ स्थळावर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे दुलीप करंडक स्पर्धेचे आयोजन आंतरविभागीय पातळीवर न करता निवड समितीतर्फे अखिल भारतीय पातळीवर निवड करण्यात आलेल्या चार संघांदरम्यान करण्याचे निश्चित झाले आहे. बैठकीला बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के उपस्थित होते. बीसीसीआयने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात स्पष्ट केले की, ‘समितीने 2016-17 या मोसमात आयोजित होणार्या दुलीप करंडक स्पर्धेच्या आयोजनावर चर्चा केली. निवड समिती राऊंड रॉबिन पद्धतीने होणार्या या स्पर्धेसाठी चार संघाची निवड करेल. स्पर्धेतील सामने दिवस-रात्र कालावधीत आयोजित करण्यात येतील.’
भारतीय संघ न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात जवळजवळ 13 कसोटी सामने खेळणार आहे. कसोटीत खेळणारे सर्व संभाव्य खेळाडू व युवा खेळाडूंना गुलाबी चेंडूंनी खेळण्याची संधी मिळावी, असा प्रस्ताव ठाकूर यांनी ठेवला. तांत्रिक समितीच्या एका सदस्याने सांगितले की,‘अध्यक्षांना वाटते की, चॅलेंजर ट्रॉफीप्रमाणे यंदाच्या मोसमात सर्व दिग्गज खेळाडूंना व कसोटी संघातील संभाव्य खेळाडूंना कृत्रिम प्रकाशझोतात गुलाबी चेंडूने खेळण्याची संधी मिळायला पाहिजे, त्यामुळे या वेळी विभागीय पद्धतीने स्पर्धा होणार नाही.’ सौरव गांगुलीने दुलीप करंडक स्पर्धेत विदेशी संघांना खेळविण्याची सूचना केली होती, पण त्याबाबत निर्णय झाला नाही.