खान्देशात महाराष्ट्र बंदचे तीव्र पडसाद, चार ते पाच जण जखमी
जळगाव, दि. 04, जानेवारी - पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील घटनेचे बुधवारी खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले. बुधवारी जळगावातील बाजारपेठ बंद असल्याने जिल्ह्यात दगडफेक सुरू आहे. यामध्ये भुसावळ येथे तणावाची स्थिती असून बसवर झालेल्या दगडफेकीत चार ते पाच जखमी झाले आहेत.
यासोबत जिल्ह्यात इतर ठिकाणीही दगडफेक सुरू असून बसेस बंद झाल्याने शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. जळगाव शहरातील प्रमुख मार्केट असलेले महात्मा फुले मार्केट, गोलाणी मार्केट तसेच दाणाबाजार बंद आहे. असून सुवर्णबाजारात बंदला संमिश्र प्रतिसाद आहे. जळगाव-पाचोरा मार्गावर सर्व वाहने बंद आहेत. बंदमुळे एसटीच्या फे-यांवर प रिणाम होऊन अनेक बस फे-या रद्द करण्यात आल्या आहेत. शहरात रिक्षा सुरळीत सुरू असून रुग्णालये, मेडिकलही सुरू आहेत. मात्र अनेक शाळा बंद असून दहावी पूर्व परीक्षेचे पेपर रद्द करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातीलही शाळा बंद आहेत. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे जामनेर रोडवर बसवर दगडफेक करण्यात आल्याने बसमधील चार ते पाच जण जखमी झाले आहेत.