Breaking News

चीन महाराष्ट्राला कृत्रिम पावसासाठी करणार मदत

मुंबई, दि. 30 -  चीन सरकारने महाराष्ट्राला कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी मोफत सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे. चीनचे तंत्रज्ञान कृत्रिम पाऊस पाडण्यात सर्वोत्तम समजले जाते. चीन हे तंत्रज्ञान 1958 पासून यशस्वीपणे वापरत आहे. यासाठी बीजिंग, शांघाय आणि अनहुई येथून शास्त्रज्ञ सध्या मुंबईत दाखल झाले असून ते या संदर्भात संशोधन करीत असल्याचे वृत्त आहे.
चीन हे तंत्रज्ञान सर्वसाधारणपणे इतर देण्यास फारसा इच्छुक असत नाही पण महाराष्ट्राला सहकार्य करण्याची तयारी चीनने दर्शविली आहे. चीन येथील कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या शांघायचे सचिव हान झेंग काही दिवसांपूर्वी भारतात आले होते. त्या वेळी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. चीनमध्ये विमानच्या साहाय्याने किंवा तोफांतून काही रसायनांचा मारा ढगांवर केला जातो. क्लाउंड सिडिंगचे हे तंत्रज्ञान चीनमध्ये बरेच यशस्वी झाले आहे. इतर कारणांसाठीही या तंत्रज्ञानाचा वापर चीनने केला आहे. 2008 च्या बीजिंग ऑल्मिपिक वेळी बीजिंगचे अवकाश आठवडाभर स्वच्छ रहावे यासाठीही चीनने या तंत्रज्ञानाचा वापर केला होता पण 2009 मध्ये रसायनांच्या अतिरिक्त वापरामुळे बीजिंगमध्ये हिमवर्षावही झाला होता. हे तंत्रज्ञान भारताच्या हवामानच्या परिस्थितीला कितपत लागू पडेल याचा अभ्यास सध्या चीनचे संशोधक करीत असल्याचे वृत्त आहे.