Breaking News

पेन्शनधारकांचे रामलीला मैदानावर आज धरणे


श्रीरामपूर प्रतिनिधी ;- पेन्शनधारकांना पेन्शनवाढ मिळावी, या आणि अन्य मागण्यांसाठी नवीदिल्ली येथील रामलीला मैदानावर उद्या {दि. २१} धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. खा. भगतसिंग कोशियारी समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, सेवानिवृत्तांना दर्जेदार, मोफत वैद्यकीय सुविधा द्यावी, अन्नसुरक्षा कायदा लागू करावा या आणि अन्य मागण्यांसंदर्भात हे आंदोलन होणार आहे. यासाठी राज्यातील हजारो पेन्शनधारक नवीदिल्ली येथे रवाना झाले आहेत. संघटनेचे अध्यक्ष गोरख कापसे, सरचिटणीस सुभाष कुलकर्णी, कार्याध्यक्ष एस. एल. दहिफळे, उपाध्यक्ष बाबासाहेब गाडे, ज्ञानदेव आहेर, बाबुराव दळवी आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे.