Breaking News

वियोगाच्या कल्पनेने ‘त्या’ गहिवरल्या!


प्रवरानगर प्रतिनिधी ;- शिक्षणाच्या निमित्ताने बालवयातील अनेक वर्षे ‘त्या’ एकत्र राहिल्या. मात्र पुढील शिक्षणासाठी आता ‘त्यांना’ बाहेर पडावे लागणार आहे. परंतु, भावी आयुष्यात पदार्पण करण्याच्या उत्सुकतेबरोबरोच होत असलेल्या वियोगामुळे ‘त्या’ प्रचंड गहिवरल्या. 

येथील प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांना संस्थेच्यावतीने नुकताच निरोप देण्यात आला. यावेळी सर्वच मुलींना गहिवरून आले. मात्र कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. पी. एस. शिंदे यांच्या व्याख्यानामुळे पुन्हा एकदा सर्वांनाच उत्साह आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज मधील निवृत्त प्राध्यापक पी. एम शिंदे, एम. पी. एस. सी. परीक्षा देणारी, याच विद्यालयाची माजी विद्यार्थिनी विद्या पुरंदरे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यपिका जयश्री भोंडे, प्रा. रमेश नागरे, प्रा. सोमनाथ भुसाळ आदी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी प्राचार्या लिलावती सरोदे यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी पज्ञा कुलकर्णी, दर्शना नागरे, दिव्या मोरे, ऋतुजा मोरे, गायत्री पवार, वैशाली बेणगे, तनुजा धनवटे, समृद्धी साठे, प्रणाली खरे, ज्ञानेश्वरी नाईकवाडी, अक्षदा कळमकर, निकिता शिंदे, किर्ती देशमुख, नूतन बुडखे, अनुजा कड, गायत्री शिंदे, आश्विनी देवरे, प्रियंका काळे, ऋतुजा काळे आदी विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले.