Breaking News

कडबा कुट्टी आणि इलेक्ट्रिक मोटारी मंजूर

आश्वी : प्रतिनिधी ;- शिर्डी मतदार संघातील आश्वी जिल्हापरिषद गटासाठी अध्यक्षा शालिनी विखे यांच्या मार्गदर्शनाखाली पात्र लाभार्थ्यांना लाभार्थ्याना अकरा कडबाकुट्टी आणि दोन इलेक्ट्रिक मोटारींना मजूंरी मिळाली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्या अँड. रोहिनी निघुते यांनी दिली.


राज्याचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांच्या आश्वी बुद्रुक येथील कार्यालयात आयोजित बैठकीत त्यानी ही माहिती दिली. याप्रसंगी प्रकाश उंबरकर, माधवराव गायकवाड, अशोक म्हसे, किशोर ज-हाड, जगन्नाथ चतुरे, ज्ञानदेव वाकचौरे, सत्तार तांबोळी, शंकरराव हिगें, भारत ज-हाड, विजय म्हसे, राजेंद्र गायकवाड, अनिल गायकवाड, पंचायत समितीचे कृषी सहाय्यक अधिकारी किरण अरगडे, श्रीमती यादव आदींसह पात्र लाभार्थी उपस्थित होते.