भविष्यात ग्रामीण भागातून मोठे अधिकारी तयार होतील : पारगावकर
नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील गोरक्षनाथ विद्या प्रसारक मंडळाच्या श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा सुवर्णमहोत्सव आणि माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. कंपनीच्यावतीने बांधण्यात आलेल्या तीन नवीन वर्ग खोल्यांचे उदघाटन अरविंद पारगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक जगन्नाथ बारगळ होते. विद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या नंदूरबार येथे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या डॉक्टर अर्चना पठारे यांनी विद्यार्थ्यांना ‘स्पर्धा परीक्षा’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी यांनी विद्यार्थ्यांना ‘पोलिस खात्यातील संधी’ याविषयी माहिती दिली. यावेळी माजी विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉक्टर विजय गायकवाड, रघुनाथ झिने, पांडुरंग झिने, राधाकिसन भूतकर यांनी विद्यालयाच्या या कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमास संस्थेचे सेक्रेटरी सुरेश गुंड, विश्वनाथ आढाव, रमेश शिंदे, रामनाथ झिने, डॉ. रुशभ फिरोदिया, ईश्वर हांडे, उद्योजक सुभाष झिने, प्रताप़ झिने, सरपंच संतोश झिने, दत्तात्रय भोदे माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहवाल वाचन प्राचार्य ज्ञानदेव खराडे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता गुंड, अनिल पोटे यांनी केले. संभाजी पवार यांनी आभार मानले.
