Breaking News

शंभूराजे चौकाध्ये शिवजयंती उत्साहात


अहमदनगर प्रतिनिधी : येथील श्री शंभूराजे चौकातील शिवप्रेमी मित्रमंडळाच्यावतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण वाखुरे यांच्या हस्ते हिंदुस्थानचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण व विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, विपुल वाखुरे, इंजिनिअर कैलास दिघे, विधिज्ञ विक्रम वाडेकर, विकास जोशी, महेंद्र नांदूरकर, सचिन निक्रड, प्रदीप वाखुरे, राहुल जोशी, दिपक भंडारी, राहुल काळे, परेश राऊत, संतोष चेमटे, शिवाजी मुंगसे, रेवजी नांगरे, संदीप घुले त्याचप्रमाणे बालचमूंमध्ये वेदिका वाडेकर, विराज वाखुरे, सोहा जोशी, अवनी जोशी, पियाली दिघे, श्रावणी वाखुरे, ईश्वरी पवार आदींसह परिसरातील शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.