Breaking News

विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप


अहमदनगर :- सामाजिक कार्य करणार्‍या महिलांच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. प्रारंभी अहमदनगर ऐतिहासिक वास्तू संग्राहलय येथील राजमाता जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच केडगावच्या सावली संस्थेत वंचित घटकातील विद्यार्थ्यांना किराणा व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी रेखा जरे, सुरेखा सांगळे, अज्जू शेख, मनिषा गायकवाड, संगिता शर्मा, विनोद साळवे, मंगल भुजबळ, संदिप पवार, अशोक झोटींग, प्रशांत पाटोळे, यश शर्मा आदी उपस्थित होते.

जरे म्हणाल्या की, जिजाऊंच्या संस्काराने शिवबा घडले. भावी पिढीला योग्य दिशा देण्यासाठी संस्काराची आवश्यकता आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी व आपले ध्येय गाठण्यासाठी स्वामी विवेकानंदांचे विचार दिशादर्शक आहे. सामाजिक दायित्वातून वंचित घटकांसाठी मदत करणे हे सर्वांचे कर्तव्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सुरेखा सांगळे यांनी बिकट परिस्थितीने न डगमगता शिक्षणाने आपले ध्येय गाठण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले.