Breaking News

दोडामार्गला कृषी पर्यटनाचा ब्रँड बनवा - कोकण उपायुक्त


निसर्ग संपन्न दोडामार्गला कृषी पर्यटनाचा ब्रँड बनवा आणि देशी-विदेशी पर्यटकांना गोव्या ऐवजी दोडामार्गकडे वळवा, अशी अपेक्षा कोकण उपायुक्त (आस्थापना) गणेश चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. येथील पंचायत समितीच्या तपासणीसाठी ते येथे आले होते.


दर पाच वर्षांनी प्रत्येक तालुक्याच्या कामकाजाची तपासणी केली जाते. दरवर्षी विभागातील साधारण नऊ तालुक्यांची तपासणी होते. दोडामार्ग या 45 व्या तालुक्याची तपासणी क रण्यासाठी चौधरी पथकातील अन्य सदस्यांसह येथे आले. कामकाज आटोपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 
पंचायत समितीची स्वतंत्र इमारत, शिक्षण विभागाचा आकृतिबंध, पशूसंवर्धन विभागातील पशूसंवर्धन अधिकार्‍याचे रिक्त पद, बचत गटातील महिलांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगार अशा विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली. ते म्हणाले, तालुका नवीन आहे. त्यामुळे समस्या जाणवणारच. त्या सोडवण्यासाठी सर्वांनी रचनात्मक काम करण्याची गरज आहे. इमारत बांधकाम पहिला प्रश्‍न आहे, रिक्त जागा भरणे दुसरा प्रश्‍न आहे, शिक्षण खात्याचा आकृतिबंध मंजुरीसाठी प्रयत्न करणे आहे. तुम्हाला विभागीय आयुक्त स्तरावरून जे काय सहकार्य हवे असेल ते आम्ही देऊ, तुम्ही प्रस्ताव द्या, असे त्यांनी सभापती गणपत नाईक आणि गटविकास अधिकारी व्ही.एम.नाईक यांना सांगितले.
उमेद अभियानच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाची चळवळ जोरात आहे. त्या चळवळीतील महिला बचत गटांनी जास्तीत जास्त काम देण्याचा प्रयत्न व्हायला हवा. रत्ना गिरीतील देसाई आंबेवाल्यांना आंबे पॅकिंगचे काम बचतगटातील महिलांना देण्यास आम्ही सांगितल, त्यांनी ते मान्य केल. तसा प्रयत्न इथे व्हायला पाहिजे असेही त्यांनी सां गितले. गटविकास अधिकारी नाईक यांना तसा प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
पंचायत समितीच्या इमारतीसाठी पाच कोटी रुपये मंजूर आहे. परंतु प्रस्तावास एक दोन त्रुटी आहेत, त्या दूर करा. विभागीय आयुक्त स्तरावरून आम्ही लागेल ते सहकार्य करू, मंत्रालय पातळीवर पाठपुरावा करा आणि एप्रिलमध्ये भूमिपूजन करा. तालुका विक्री केंद्रामुळे अडथळा येत असेल तर त्याचा ठराव आणि प्रस्ताव वेगळा करा, पण स्वतंत्र इमारतीचे काम लवकरात लवकर सुरु करा, असेही चौधरी म्हणाले.
ते म्हणाले, येथील निसर्ग भुरळ पाडणारा आहे. पर्यटनाला मोठा वाव आहे. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून मोठा रोजगार येथे उभा राहू शकतो. सेंद्रिय काजू ही दोडामार्गची महाराष्ट ्रातील ओळख आहे. या सगळ्या संधी एनकॅश करण्याची गरज आहे. निसर्गसंपन्न दोडामार्गला कृषी पर्यटनाचा ब्रँड बनवा आणि देशी-विदेशी पर्यटकांना गोव्याऐवजी दोडामार्गकडे वळवा असेही ते म्हणाले. दोडामार्गला पुन्हा मुद्दामहून मे मध्ये भेट देण्याचेही त्यांनी मान्य केले. सभापती गणपत नाईक यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. पंचायत समिती तपासणीदरम्यान त्यांनी सर्व विभागप्रमुख आणि कर्मचार्‍यांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावाही घेतला. दरम्यान, रुग्णवाहिकेची गरज अत्यावश्यक सेवेत येते. त्यामुळे ज्या ठिक ाणी रुग्णवाहिका नाही अथवा शासनाकडून तत्काळ मिळेल अशी स्थिती नाही, त्याठिकाणी रुग्णवाहिका भाडेतत्वावर घेण्यास हरकत नाही अशी सूचनाही त्यांनी केली. शासनाक डून त्या ठरावाला/प्रस्तावाला मान्यता मिळेल असेही ते म्हणाले.