Breaking News

नगर सेवक सचिन घुले अपघातातून बचावले


कर्जत नगर पंचायतीचे नगरसेवक सचिन घुले आणि त्यांचा मिञ अमोल कदम हे कोळवडी येथील कुकडी वसाहतीजवळून जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्या अपघातामध्ये त्यांना किरकोळ इजा झाली आहे. घुले व कदम हे पुण्यावरून कर्जतला येत होते. पहाटे 3 वा. कर्जत तालुक्यातील कोळवडी येथील कुकडी वसाहती जवळ आले असता अमोल कदम यांना डुलकी लागल्याने स्विफ्ट गाडी रस्त्यावरून खाली उतरली. सोमरील तीन झाडे चुकवत व कर्जतच्या फिल्डर पाण्याचा व्हॉल्वचुकवत गाडीने जंप घेत तीन पलटी मारत गाडी पलटी झाली. गाडी लॉक झाल्याने त्यांना बाहेरही पडता येत नव्हते परंतू त्या अपघातामधून ते सुखरूप बाहेर आले.

थोरातांची मदत
जवळच राहत असलेले संपत थोरात यांना गाडीच्या आवाजाने जाग आली. त्यांनी अपघात झाल्याचे समजताच जवळ जावून पाहिले असता, आत दोघे आडकल्याचे दिसले. गाडी लॉक असल्याने त्यांनी गाडीच्या काचा फोडून घुले व कदम यांना बाहेर काढले.

मा. जि. प. सदस्य ही वाचले.
सन 2009 साली मा. जि.प.सदस्य काँग्रेस पक्षाचे नेते पै. प्रविण घुले ही नगर जवळ झालेल्या आपघाततुन बचावे होते. दोघेही बंधू भिषण आपघातातुन बचावल्याने कर्जत मध्ये घुलेच्या पाठीमागे गोदड महाराजांची शक्ती असल्याची प्रतिक्रिया अनेकानी व्यक्त केल्या.