Breaking News

शिवजयंतीनिमित्त उपक्रमांना कर्जत तालुक्यातुन उत्स्फुर्त प्रतिसाद


कर्जत तालुक्यातील कुळधरण ग्रामविकास संघटनेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त आयोजित शालेय विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. या विविध स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षिस वितरण समारंभ होत आहे. आज दै. लोकमंथनचे संपादक अशोक सोनवणे, ज्येेष्ठ विचारवंत अन्वर राजन यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रांचे वितरण होणार आहे. कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात तालुक्यातील पाच आदर्श पुरस्कारांचे वितरण तसेच कर्तृत्ववान भुमिपुत्रांचा विशेष सत्कार होणार आहे. चित्र रंगवा स्पर्धेत तालुक्यातील 160 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे.तालुकास्तरिय वक्तृत्व स्पर्धेत 35 विद्यार्थी सहभागी होत आहेत.विद्यार्थ्यांचे पालकांचे गेल्या तीन वर्षापासुन आकर्षण ठरत असलेल्या संघटनेच्या विविध गुणदर्शन स्पर्धेसाठी कर्जत, मिरजगाव, राशिन, खेड, कुळधरण, सुपेकरवाडी आदी परिसरातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. तरी या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन संघटना मार्गदर्शक शेषेराव सुपेकर तसेच सुधीर जगताप, बंडू सुपेकर, बंटीराजे जगताप, प्रा. किरण जगताप यांनी केले आहे.