मुंबई : मुंबईमध्ये फेसबुकवर मैत्री करून दरोडा घालणा-या टोळीतील 3 आरोपींना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. अन्य आरोपींचा पोलीस शोध सुरु असून यामध्ये काही मुली आरोपी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.या टोळीतील मुली फेसबुकवरून श्रीमंत व्यक्तींना ’फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवतात. समोरच्या व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली त्यांच्याशी चॅटिंग करून मैत्रीसंबंध प्रस्थापित करुन जाळ्यात फसलेल्या व्यक्तीला लुटतात. अशाच प्रकारे या टोळीतील एका मुलीने शिवराज शेट्टी या व्यक्तीला फेसबुकच्या माध्यमातून गोवंडीच्या इंडियन ऑइल कंपनीजवळ भेटायला बोलावले. शेट्टी या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांना 6 लोकांनी धरून बेदम मारहाण केली आणि शेट्टी यांच्याजवळील किमती दागिने, रोकड असा एकूण 5 लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पळ काढला. याप्रकरणी शेट्टी यांनी पोलिसांकडे गुन्हा दाखल केला. त्यावरून पोलिसांनी गोवंडी, पंजारापोळ, देवनार या ठिकाणी सापळा रचून 3 संशयित आरोपींची धरपकड केली. या टोळीतील आणखी 3 आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
मैत्रीच्या नावाखाली दरोडा घालणारी टोळी गजाआड
Reviewed by Dainik Lokmanthan
on
09:15
Rating: 5