Breaking News

महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक झोपडपट्टीत एक ग्रंथालय सुरू करा - रामदास आठवले

 सांगली - मिरज - कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात विविध 17 झोपडपट्टया आहे. त्यामध्ये जवळपास 30 हजार घर संख्या आहे. या प्रत्येक झोपडपट्टीत एक ग्रंथालय सुरू करा. या ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल. या माध्यमातून त्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा दीपस्तंभ उजळू द्या, अशा सूचना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे दिल्या. शासकीय विश्रामगृह येथे सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. 


केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून मागासवर्गीयांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. या योजनांची सांगली जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी. गरजूंना या योजनांचा लाभ द्यावा. तसेच, विविध कर्ज योजनांचा लाभ घेऊन गरजूंनी आपली प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शिष्यवृत्तीचा आढावा घेताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, मॅट्रिकपूर्व आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचा लाभ एकदाच वर्षाअखेरीला देण्यात येतो. त्यासाठी 75 टक्के उपस्थिती आवश्यक असते. मात्र, या शिष्यवृत्तीचा लाभ वर्षातून दोनदा देण्यासाठी आपण प्रयत्नरत आहोत. तसेच, सांगली जिल्ह्यात 21 शासकीय वसतिग ृहांमध्ये 1 हजार 653 विद्यार्थी आहेत. त्यासाठी प्रति विद्यार्थी प्रति माह 4 हजार 120 रुपये दिले जातात. अशासकीय वसतिगृहांना प्रति विद्यार्थी प्रति माह 900 रुपये दिले जातात. ही रक्कम वाढवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.