Breaking News

पीएनबीनंतर आता बँक ऑफ महाराष्ट्रलाही गंडा, तक्रार दाखल


पंजाब नॅशनल बँकेतील आर्थिक घोटाळ्यानंतर आता बँक ऑफ महाराष्ट्रालाही 9.5 कोटी रुपयांना गंडा घातला असल्याचे समोर आले आहे. बँकेकडून कर्ज थकवणार्‍या चार उद्योजकांविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीच्या आधारे चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दिल्लीतील उद्योजक अमित सिंगला, त्याचे वडील रोशनलाल, आई सुमित्रा देवी आणि अन्य एकाचा समावेश आहे. अमित सिंगला याची कंपनी ’आशीर्वाद चेन’ने बँक  ऑफ महाराष्ट्राकडून 9.5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले असून ते अद्यापर्यंत फेडले नसल्याचे सांगण्यात येत आहे.