Breaking News

शिर्डीत विकासकांमांना उत्साहात प्रारंभ


शिर्डी/प्रतिनिधी  :- श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या श्री साईप्रसादालयात {नवीन भक्‍त निवासस्‍थान} ग्रॅनाईट फ्लोअरिंग बसविण्याचा आणि रस्‍त्‍याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्‍या हस्‍ते नुकताच करण्‍यात आला. यावेळी संस्‍थानचे उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडेपाटील, कार्यकारी अभियंता रविंद्र घुले, प्रशासकीय अधिकारी उत्‍तमराव गोंदकर, उपअभियंता सर्वश्री रविंद्र भामरे, दिनकर देसाई, चेतन खैरनार, प्रसादालय विभाग प्रमुख विष्‍णु थोरात व कर्मचारी उपस्थित होते.
श्री साईबाबा समाधी शताब्‍दीच्‍या अनुषंगाने श्री साईप्रसादालयातील भोजन हॉल व पाकगृहात जुने व्‍हेट्रीफाईड टाईल्‍स काढून नवीन ग्रॅनाईट फ्लो‍अरिंग बसविण्‍याचा निर्णय व्‍यवस्‍थापन मंडळाने घेतला आहे. सुमारे ७० हजार चौरसमीटर क्षेत्रफळात हे ग्रॅनाईट फ्लोअरिंग बसविण्‍यात येणार आहे. डांबरीकरणाच्‍या कामाकरीता ३८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. ही दोन्‍ही कामे येत्‍या ५ महिन्यांत पूर्ण करण्‍यात येणार आहेत.