Breaking News

पोदार इंटरनॅशनल स्कूलचे पहिले वार्षिक संमेलन संपन्न


पोदार इंटरनॅशनल स्कूल, अहमदनगरचा पहिला वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच पार पडला. सदर संमेलनात पारितोषिक वितरणाचा सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पार पडला. त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना व कर्मचारी वर्गाला बक्षिसे मुख्य अतिथी व पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आली. शाळेचा वार्षिक अहवाल पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य मंगेश जगताप यांनी सादर केला. वार्षिक संमेलनमध्ये सर्व नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम हे अतिशय अद्वितीय थीमवर आधारित होते. पूर्व प्राथमिक वर्गाची संकल्पना जय जवान, जय किसान ही होती. जगाला भेडसावत जातीवरुन वादाची समस्या व त्यावर उपाय याचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी आपल्या विना संवाद नाटीकेतून केले.