Breaking News

विखे पाटील कारखान्याच्या उपाध्यक्षपदी कैलास तांबे


लोणी प्रतिनिधी :- येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी चिंचपूर येथील प्रगतशील शेतकरी कैलास तांबे यांची निवड करण्यात आली. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. यावेळी अहमदनगर येथील प्रादेशिक सहसंचालक साखर एस. आर. डोंगरे या उपस्थित होत्या. मावळते उपाध्यक्ष पोपटराव लाटे आणि कारखान्याचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष कैलास तांबे यांचा अध्यक्ष सुजय विखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी कारखान्याचे संचालक रामदास देठे, भागवत उंबरकर, राजेंद्र घोलप, शिवाजी घोलप, राजेंद्र खर्डे, रामचंद्र जवरे, प्रताप तांबे, अशोक गाडेकर, पाराजी धनवट, विजय खर्डे, पोपटराव उंबरकर, विक्रांत विखे, अनिल भोसले, मच्छिंद्र पावडे, जयवंतराव जोर्वेकर, सारंगधर दुशिंग, अण्णासाहेब बेंद्रे, भाऊसाहेब चेचरे, संचालिका सुनंदा खर्डे, रजनी बालोटे, कामगार संचालक मधुकर घोगरे, कारखान्याचे कार्यकारी संचालक ए. आर. ताबे, आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित उपाध्यक्ष कैलास तांबे यांची निवड झाल्याबद्दल राज्याचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी अभिनंदन केले.