Breaking News

भिकाऱ्यांची विसापूरच्या भिक्षुकी सुधारगृहात रवानगी


शिर्डी प्रतिनिधी :- साई बाबांच्या साईनगरीत खाण्याची व राहण्याची चिंता नसल्यामुळे शिर्डीत गेल्या काही दिवसांत भिका-यांची संख्या वाढली होती. ही बाब लक्षात घेत नगराध्यक्षा योगिता शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी शहर भिक्षुकमुक्त शहर करण्यासाठी भिक्षुकांना उचलण्याची मोहीम राबविण्यात आली. अंर्तंगत ४५ भिक्षुकांना पकडून त्यांची वैद्यकिय तपासणी करी या सर्वांची विसापूरच्या भिक्षुकी सुधारगृहात रवानगी करण्यात आली.
साई बाबा संस्थान, शिर्डी नगरपंचायत व शिर्डी पोलिस ठाण्याच्यावतीने संयुक्तीक मोहीम राबविण्यात आली. शिर्डी शहरातील जूना पिंपळवाडी रस्ता, व्दारकामाई परीसर, प्रवेशव्दार क्र. एक, दोन, तिन व चार आदी परीसरातून ४५ भिक्षेकरी उचलण्यात आले. त्यानंतर त्यांची वैद्यकिय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना राहाता न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने त्यांना भिक्षेकरी सुधारगृहात पाठविण्याचे आदेश दिले. राज्य शासनाने नुकतेच विसापूर येथे भिक्षेकरी सुधारगृह तयार केले आहे. राज्यातील प्रमुख देवस्थानांना त्यांच्या परिसरात असणारे भिकारी पाठविण्यात यावे, अशी माहीती प्राप्त झाली आहे. त्यानुसार शिर्डी संस्थानने ही कारवाई केली. शिर्डी शहर यापुढे कायम भिकारीमुक्त दिसेल, भिका-यांमुळे होणा-या त्रासापासून साईभक्त आणि ग्रामस्थ यापुढे सुटकेचा मोकळा श्वास घेतील, असा विश्वास नगराध्यक्षा तथा विश्वस्त योगिता अभय शेळके पाटील यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.