Breaking News

धार्मिक दहशतवाद संपल्याशियाय देशाचा विकास अशक्य : भोसले


पैठण प्रतिनिधी :- कोणताही चमत्कार हा एक तर रासायनिक अभिक्रिया असतो, भौतिक अभिक्रिया असतो किंवा हातचलाखी असते. तरुणांनी व्यसनापासून दूर रहावे. व्यसनामुळे समाज नपुसंक बनत आहे. भक्तीमध्ये दलाली करणाऱ्यांपासून सावध रहावे. धार्मिक दहशतवाद संपल्याशियाय देशाचा विकास अशक्य आहे, असे प्रतिपादन शहाजी भोसले यांनी केले. 
येथील ताराई महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या धनगाव येथील 'पर्यावरण संवर्धनासाठी युवक 'या शिबिरप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी बबनराव बोबडे, उपसरपंच योगेश बोबडे, बापूराव बोबडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. गणेश शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोमनाथ थोरात, प्रा रामेश्वर म्हस्के, प्रा. गणेश इंगळे, प्रा. स्वप्नील गिरगे, अंजली मडके, अश्विनी वाणी, अश्विनी घवाडे, जयश्री सुडके, जयश्री जाधव, छाया घावट, शीतल जाधव, दत्ता चिंचखेडे, रुपेश देवढे, योगेश होरकटे, योगेश पवार, करण बोडखे, रामेश्वर गायके, विकास जाधव, महेश गहाळ, महेश मुळे, गोपाळ बोबडे, किशोर बोबडे, कृष्णा पातकळ आदींनी पुढाकार घेतला. प्रा. गौरी कल्लवार आणि डॉ. बाळासाहेब शिंदे यांनी मार्गदर्शन केले. श्वेता पतंगे हिने आभार मानले.