Breaking News

सावळीविहीर येथील महिलेचा मृत्यू


शिर्डी/प्रतिनिधी  :- शिर्डीलगतच्या सावळीविहीर येथील भावना अशोक महाले {वय २४ } या महिलेला राहत्या घरी प्रसूतीनंतर उलट्या व इतर त्रास झाला. उपचारासाठी तिला साईबाबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. घाटी हॉस्पिटलच्या खबरेवरून शिर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूच्या घटनेची नोंद केली.