Breaking News

नामदेव राशीनकरचे सुयश


चांदा /प्रतिनिधी /-नेवासा तालुक्यातील रहिवासी व माईर्स एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनियरिंग ,पुणे येथे तंत्रसाहाय्यक म्हणून कार्यरत असलेले नामदेव शंकर राशिनकर यांचे नुकतेच पेंटन्ट प्रकाशित झाले आहे. मॅकनिकल इंजिनियरिंगमधील ग्राइंडिंइंग ऑपेरेशनमध्ये फीरत्या वर्कपीसचे तापमान मोजण्यासाठी त्यांनी नावीन्यपूर्ण पद्धत शोधून काढली आहे. त्यांच्या या पद्धतीचे कंट्रोलर ऑफ पेटंट प्रकाशित केले आहे. भारत सरकारने ११लाख रुपये अर्थसहाय्य दिलेल्या संशोधन प्रकल्पावर राशिनकर हे प्रकल्प सहाय्यक म्हणून काम करत आहे. त्यांना संस्थेचे संचालक डॉ. योगेश जयंत भालेराव व प्रा. माया चरडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. राशिनकर हे पेटंट मिळवणारे जिल्ह्यातील प्रथम तंत्रज्ञ ठरले आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.