Breaking News

गणेशवाडीत श्री गजानन महाराज संगीत कथा व पारायणसोहळा उद्यापासून प्रारंभ


सोनई/प्रतिनिधी /- ह.भ.प. तपोनिधी माधव बाबा लांडे वाडीकर यांच्या कृपा आशीर्वादाने महाशिवरात्री निमित्ताने प्रथमच गणेशवाडी येथे महादेवाचे प्रांगणात गुरुवार दि, ८ फेब्रुवारी१८ ते १५ फेब्रुवारी१८ या कालावधीत श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्री गजानन महाराज संगीत कथा सोहळ्याचे आयोजन केले आहे. अशी माहिती संयोजक ज्ञानदेव पा. लोहकरे यांनी दिली. 
या ठिकाणी ८ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता, ह.भ.प. निवृत्ती नाथ लांडे महाराज यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण, ग्रंथपूजन ह.भ.प.बाबूराव महाराज लोहकरे करणार आहे.त्या काळात बऱ्याच वर्षांनी गजानन महाराज कथेचे प्रवक्ते ह.भ.प.गुरुवर्य शंकर महाराज डोईफोडे (आळंदी देवाची) यांच्या वाणीत कथा श्रवण करायला मिळणार आहे. पहाटे 4 ते 6 वाजता काकडा भजन,७ ते ८ विष्णू सहस्रनांम, ८ ते ११ वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५ ते ६ वाजता हरीपाठ, व रात्री ८.३० ते ११ वाजेपर्यंत श्री गजानन महाराज संगीत कथा होणार आहे. 

या कार्यक्रमास ह.भ.प. कैलास झुगे, ह.भ.प.अशोक नरवडे, ह.भ.प. शिवाजी दादा लांडे याचे सह अनेक मान्यवर हजर राहणार आहे. १५ रोजी सकाळी९ ते ११ वाजता ह.भ.प. शंकर महाराज डोईफोडे यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाने सांगता होणार आहे. या सोहळ्यासाठी संतोष दरंदरले, आसाराम आव्हाड, विष्णू भोर, अरुण गडाख, किसन लोहकरे, संदीप लोहकरे, कैलास लोहकरे, ज्ञानदेव डवले, कैलास दहिफळे, बाबासाहेब लोहकरे, नंदू बेल्हेकर, गणेश भोर, मुरलीधर होन, आदी सोहळा यशस्वी होण्यासाठी परीश्रम घेत आहे. तरी या धार्मिक कार्यक्रम याचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.