Breaking News

सरकारविरोधात मोट बांधण्यासाठी विरोधक सज्ज सोनिया गांधी यांचा पुढाकार ; आज विरोधी पक्षांची बैठक

नवी दिल्ली : केंद्रातील भाजप सरकारविरोधात विरोधकांची मोट बांधण्यासाठी आता काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पुढाकार घेतला आहे. कारण आज गुरूवारी सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी सगळ्या समविचारी पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण धाडण्यात आले आहे. शिवाय 9 फेब्रुवारीला सोनियांनी या नेत्यांसाठी डिनरचेही आयोजन केले आहे. 


दोनच दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधी पक्षांच्या नेत्यांची चर्चा झाली. ज्याचे नेतृत्व काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांनी केले होते. मात्र या बैठकीला बहुजन समाज पक्ष, समाजवादी पार्टीचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते. दरम्यान, सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले असून यावेळी संसदेत विरोधकांनी कोणती भूमिका घ्यायची याची रणनिती आखण्यासाठी ही डिनर डिप्लोमेसी असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान विरोधकांच्या या बैठकीला काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, जेडीयूचे बंडखोर नेते शरद यादव, नॅशनल कॉन्फरन्स, माकप आदी पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.