Breaking News

स्कॉर्पिअन ‘करंज’ पाणबुडीचे जलावतरण


नौदलाच्या सामर्थ्यात भर; पाण्यात छुप्या पद्धतीने माहिती गोळा करण्याची क्षमता
मुंबई : स्कॉर्पिअन श्रेणीतील तिसरी पाणबुडी करंज ही नौदलाच्या ताफ्यात बुधवारी दाखल झाल्यामुळे नौदलाच्या सामर्थ्यांत भर पडली. माझगाव डॉक येथे या स्वदेशी बनावटीच्या पाणबुडीचे जलावतरण करण्यात आले. या सोहळ्याला नौदलाचे प्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लांबा हे उपस्थित होते. ‘मेक इंन इंडिया’अंतर्गत ही पाणबुडी तयार करण्यात आली आहे. शत्रूला लक्ष्य करणे आणि पाण्यात राहून छुप्या पद्धतीने माहिती गोळा करण्याची क्षमता या पाणबुडीत आहे. टॉर्पिडो, जहाजभेदी अशा क्षेपणास्त्रांनी ही पाणबुडी सज्ज आहे. करंज पाणबुडी 67.5 मिटर लांब, 12.3 मिटर उंच आणि 1565 टन वजनाची आहे. जास्तीत जास्त काळ पाण्याखाली राहता यावे यासाठी पाणबुडीत ऑक्सिजन निर्मितीची व्यवस्था करण्यात आली आहे. या श्रेणीतील पहिली पाणबुडी आयएनएस कलवरी आणि दुसरी आयएनएस खंडेरी असून अशा 6 पाणबुड्या बनवण्यात येणार आहेत.