Breaking News

बीडच्या रस्त्यांनी घेतला मोकळा श्‍वास !


बीड (प्रतिनिधी) शहरातील प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे अतिक्रमणे करण्यात आली होती. रस्त्याच्या कडेस असलेल्या दुकानांमुळे रहदारीस अडथळा येत होता. अख्खे रस्तेच्या रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले होते. त्यामुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत होता. यासंदर्भात नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांनी अतिक्रमण हटवण्यास सुरूवात केली. काही व्यक्तींनी त्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला. पालिके च्या अधिकार्यांना आणि कर्मचार्यांनाही रोखले. तेव्हा जावळीकरांनी पोलिस प्रशासनाला पाचारण केले. डिवायएसपी सुधीर खिरडकर आणि शहर ठाण्याचे पोनि सय्यद सुलेमान यांनी तातडीने अतिक्रमण स्थळी दाखल होवून पोलिस बंदोबस्तात कारवाईला गती दिली. या सर्व प्रक्रियेमध्ये पालिका आणि पोलिस प्रशासनाने सांमजस्य घडवून आणल्याने शहर आता मोक ळा श्‍वास घेवून लागले आहे. ही कारवाई अशीच पुढे सुरू रहावी आणि रस्ते हे लोकांच्या रहदारीसाठीच असतात हे दाखवून द्यावे अशी अपेक्षा नागरीकांतून व्यक्त होत आहे.