Breaking News

सार्वजनिक समितीकडून शिवजयंती उत्सवाची जय्यत तयारी

बुलडाणा, 8 फेब्रुवारी (प्रतिनिधी) ः अखिल विश्‍वाचे शौर्यप्रतिक छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती वैचारिक प्रबोधनाने साजरी व्हावी या उद्देश्याने मागील दोन वर्षीपासून बुलडाण्यात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून सर्वव्यापक शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. यावर्षीसुद्धा बुलडाणेकरांच्या सहभागाने भव्य-दिव्य जयंती साजरी करण्याच्या अनुषंगाने सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती तयारीला लागली असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्व पक्ष, संघटना, सामाजिक संस्था, युवक, विद्यार्थी तसेच शिवभक्तांनी मोठ्या संख्येत यात सहभाग दर्शवावा, असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 


या कार्यक्रमांची सविस्तार माहिती देण्यासाठी पत्रकार भवनमध्ये दुपारी 1 वाजता पत्रकार प रिषद झाली. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. राजेश्‍वर उबरहंडे, पदसिद्ध सचिव सुनिल सपकाळ तसेच इतर पदाधिकार्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमांची रूपरेषा मांडण्यात आली. त्याअंतर्गत 17 फेब्रुवारीला सायंकाळी 6.30 वाजता गांधी भवन येथे प्रख्यात विचारवंत प्रा. डॉ. शिवरत्न शेटे यांचे व्याख्यान होणार आहे. तर 18 फेब्रुवारी रोजी अंतरराष्ट्रीय शाहीर प्रसाद विभूते यांचा शाहीरी लोककलेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजेपासून येथील जिजामाता स्टेडीअम वि विध सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. याठिकाणी राज्यातील प्रमुख गड-कि ल्ल्यांवरची माती आणि जल आणून शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाईल. याच दिवशी दुपारी 3 वाजता संगम चौकातून शोभायात्रा निघेल. याशिवाय शहरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. विशेष म्हणजे समितीकडून कुठल्याच प्रकारचे वर्गणी पुस्तक किंवा पावती पुस्तक छापण्यात आले नसून सदर कार्यक्रमांसाठी होणारा खर्च स्वेच्छा निधी म्हणून शिवप्रेमींकडून गोळा केला जाणार आहे. शिवजयंती अनुशासनबद्ध आणि सुनियोजित पार पडावी यासाठी 200 पेक्षा अधिक सक्रिय सदस्यांची समिती गठित करण्यात आली असून केंद्रीय कार्यकारिणी आणि उपसमित्यांकडे विविध प्रकारची जबाबदार्या सोप विण्यात आली आहे. 

तिनही दिवसांच्या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून समस्त जनतेनी छत्रपति शिवाजी महाराज यांना मानवंदना द्यावी आणि शिवजन्मोत्सव लोकोत्सव व्हावा, असे आवाहन अध्यक्ष डॉ. राजेश्‍वर उबरहंडे, सचिव सुनिल सपकाळ, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. अनंत शिरसाट, मुख्य समन्वयक प्रा. सदानंद माळी, संघटक राजेश हेलगे, प्रवर्तक रणजीतसिंग राजपूत, सहकार्याध्यक्ष ऍड. जयसिंग देशमुख, कार्यवाहक सागर काळवाघे, कोषाध्यक्ष सुरेश देवकर, राहुल सपकाळ तसेच पत्रकार परिषदेला उपस्थित माजी आमदार विजयराज शिंदे, जि.प. सदस्या ऍड. जयश्रीताई शेळके, बारा बलुतेदार संघाचे राज्य उपाध्यक्ष दामोधर बिडवे, सामाजिक कार्यकर्त्या शाहिनाताई पठाण, चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डी.आर. माळी, ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी जी.टी. कुळकर्णी, माजी सरपंच ओमसिंग राजपूत, माजी जि.प. सदस्य पुरुषोत्तम लखोटीया, किसानसेनेचे उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, मातंग समाजनेते श्रीकृष्ण शिंदे इत्यादींनी केले आहे.