Breaking News

अभिनेते जितेंद्र यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप


मुंबई : प्रसिध्द अभिनेते जितेंद्र यांच्यावर त्यांच्या मामेबहिणीने लैंगिंक छळाचा आरोप केला आहे. तिने जितेंद्र यांच्याविरोधात हिमाचल प्रदेशच्या पोलिस महासंचालकांकडे तक्रार केली आहे. मात्र, जितेंद्र यांनी हा आरोप फेटाळला आहे. जितेंद्र यांच्या मामेबहिणीने पोलिस महासंचालकांकडे ई-मेल करून तक्रार दिली आहे. यानंतर पोलिसांत केस नोंदवून घेण्यात आल्याची माहिती समजतेय. खरंतरं ही घटना 41 वर्षांपूर्वी घडली आहे. 1971 मध्ये एका हॉटेलच्या रूममध्ये हा प्रकार घडला होता. पीडित महिला म्हणजेच जितेंद्र यांची मामेबहिण 18 वर्षांची आणि जितेंद्र 28 वर्षांचे होते.