लोणीत ६० टक्के मुली देताहेत १२ वीची परीक्षा!
लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील या केंद्रावर प्रा. प्रकाश विखे, प्रा. विलास खर्डे, प्रा. डॉ. अण्णासाहेब तांबे, प्रा. नंदकुमार दळे, प्रा. परसराम थेटे, प्रा. उज्ज्वल जाधव हे परीक्षा नियंत्रण समितीचे सदस्य काटेकोरपणे लक्ष ठेवून आहेत.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, जि. प. अध्यक्षा शालिनी विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, युवा नेते डॉ. सुजय विखे, संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी शिवाजी रेठरेकर-पाणिनी आदींनी १२ वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
