Breaking News

एकलव्य आणि द्रोणाचायांपासून प्रेरणा हवी : थोरात भिल्ल मेळावा उत्साहात

जाती व्यवस्था ही सध्याच्या काळात समर्थनीय नसली तरी पूर्वापार चालत आलेल्या रितीरिवाजात किंचितसे बदल करता येऊ शकतात. त्यासाठी ‘महाभारत’ या महान ग्रंथातील द्रोणाचार्य आणि एकलव्य या दोघांपासून आपण प्रेरणा घ्यायला हवी, असे प्रतिपादन कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी केले.


तालुक्यातील जोर्वे येथे दत्त मंदीराच्या प्रांगणात आदिवासी भिल्ल समाजाच्यावतीने एकलव्य जयंतीचे औचित्य साधून समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी युवकांची भव्य रॅली, गीत गायन कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी आदिवासी बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष रेवणनाथ जाधव होते. उपसभापती नवनाथ अरगडे, तालुका काँग्रेस अध्यक्ष बाबा ओहळ, जि. प. सदस्या शांता खैरे, स्वाती मोरे, पैलवान गुलाब बर्डे, शिवाजी गांगुर्डे, कैलास माळी, राजेंद्र बर्डे, आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, सरपंच रमेश खैरे, के. के. थोरात, संजय थोरात, शरद गिरी, नानासाहेब दिघे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रवलन करण्यात आले. यावेळी रेवणनाथ जाधव, प्रा. बाबा खरात, बाबा ओहळ, नवनाथ अरगडे यांची भाषणे झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंटी यादव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पी. वाय. दिघे, राजेंद्र थोरात, दिपक बारे, संतू पवार, शुभम पिंपळे, भास्कर बर्डे, निशिकांत बर्डे, गोरख पिंपळे, दत्तू पवार, शुभम बर्डे, शांताराम बर्डे, सखाराम बर्डे, सखाराम माळी, नवनाथ माळी, बाळासाहेब काकड यांनी विशेष परिश्रम घेतले. रमेश खैरे यांनी आभार मानले.