Breaking News

आ. मुरकुटेंनी काढली ध्वज मिरवणूक


नेवासा /श.प्रतिनिधी/- नेवासा नगरीचे ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या यात्रेनिमित्त आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी ध्वजाची मिरवणूक काढली. नेवासा येथील जनसंपर्क संपर्क कार्यालयापासून ध्वज मिरवणुकीस प्रारंभ झाला. आमदार बाळासाहेब मुरकुटे व उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात येऊन मिरवणुकीत प्रारंभ करण्यात आला. 
चौका-चौकात ध्वज मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. सदरची मिरवणूक एस.टी. स्टँड खोलेश्वर मंदिर, नगर पंचायत चौक, डॉ.हेडगेवार चौक,मारुती चौक मार्गे श्री मोहिनीराजांच्या मंदिरात आली. यावेळी आ. मुरकुटे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने राजेंद्र मापारी व सुधीर चव्हाण नगरसेवक सुनील वाघ यांच्या हस्ते आ मुरकुटे यांचा सत्कार करण्यात आला.

या ध्वज मिरवणुकीत भाजपचे डॉ.लक्ष्मणराव खंडागळे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, नेवासा बुद्रुकचे सरपंच दादासाहेब कोकणे, संभाजीराव ठाणगे, रंगनाथ पवार, दत्तात्रय वरुडे, दत्तात्रय बर्डे, नगरसेवक रणजित सोनवणे सुनील वाघ, नगरसेवक दिनेश व्यवहारे, रणछोडदास जाधव, मनोज पारखे, संदीप आलवणे, रोहित पवार,सागर देशमुख, रवि लोखंडे, राजेंद्र मापारी, भारत डोकडे, सचिन गव्हाणे, डेव्हिड साळवे, कृषी तज्ञ एकनाथराव भगत, राजेंद्र मुथा, डॉ.सचिन सांगळे, भास्करराव कणगरे, रहेमानभाई पिंजारी, मुक्तारभाई शेख, निवृत्ती बर्डे, सुनील मोरे, शिवा राजगिरे, भाऊसाहेब वाडेकर, आकाश गायकवाड, संजय नारळे, मनोज डहाळे, शशिकांत मतकर, स्वप्नील मापारी, ज्ञानेश्वर टेकाळे, आप्पासाहेब गायकवाड, यांच्यासह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.