Breaking News

स्वरुपा साठे यांना धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक .


पारनेर/प्रतिनीधी /- पारनेर आगारातील महिला वाहक स्वरुपा संजय साठे यांनी या 54 व्या वार्षिक क्रिडा स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेत त्यांनी 100 मीटर व 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक संपादित करत सुवर्ण पदक पटकावले आहे. त्याबद्दल त्यांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले होते. 
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने 54 व्या वार्षिक क्रिडा स्पर्धा रविवार दि.28 जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीत मलिक शैक्षणिक व क्रिडा संकुल,कोकमठान या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या. या क्रिडा स्पर्धांचे उदघाटन भारताच्या पहिला महिला कुस्तीपट्टु अंजली देवकर(वल्लाकट्टी) महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे प्रथम वाहक लक्ष्मण केवटे, महाव्यवस्थापक माधव काळे, वित्तीय सल्लागार अशोक फळणीकर, अहमदनगर विभागाचे विभाग नियंञक नितीन मैद आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

त्याच्या या यशाबद़्दल पारनेर आगाराच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या या विजयाबद्दल पारनेर आगारप्रमुख पराग भोपळे, आगारातील बसचालक, वाहक, कर्मचारी तसेच पारनेर तालुक्यातील सामाजीक, राजकिय, शैक्षणिक व धार्मिक क्षेञातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे