Breaking News

विखे यांच्या हस्ते आज विकास कामांची उदघाटने


आश्वी : प्रतिनिधी :- संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील २ कोटी रुपये खर्चाच्‍या प्राथमिक आरोग्‍य केंद्राच्‍या कामाचा भूमिपुजन समारंभ त्याचप्रमाणे कनोली आणि चिंचपूर येथील विविध विकासकामांचे उदघाटन उद्या {दि. ७} विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे यांच्‍या हस्‍ते होणार आहे. या कार्यक्रमांच्‍या निमित्ताने विखे हे नागरिकांशी विविध प्रश्‍नांसंदर्भात संवाद साधणार आहेत. यावेळी जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा शालिनी विखे, डॉ. विखे पाटील कारखान्‍याचे चेअरमन डॉ. सुजय विखे यांच्‍यासह विविध संस्‍थांचे पदाधिकारी, जिल्‍हा परिषद, पंचायत समिती सदस्‍य उपस्थित राहणार आहेत.