Breaking News

पेन्शन मागणीसंदर्भात शिक्षक संघाचे मुख्यमंत्र्यांना पत्र शिक्षक संघाचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने


अहमदनगर प्रतिनिधी :- राज्यातील शिक्षकांसह सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. दि. १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांसह सर्व कर्मचाऱयांना १९८२ ची जुनी पेन्शन लागू करावी, यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने शिक्षक व कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. 

यासंदर्भात शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संजय शेळके यांनी सांगितले, की आजपर्यंत शिक्षकांची जी रक्कम कपात करण्यात आलेली आहे, याबाबत हिशोबपत्र नाही. शासन निर्णयामुळे वरिष्ठ वेतन श्रेणी बाबत असलेला अडथळा दूर करावा व भविष्य निर्वाह निधी योजना लागू करावी या मागण्यांचे निवेदन पत्र मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले. तसेच शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राम निकम, संतोष तांबे, आबासाहेब जगताप, रावसाहेब रोहोकले, दत्ता कुलट, शरद सुद्रिक, विजय नरवडे, बाळासाहेब तपकिर, विद्या आढाव, विजय माने यांसह मोठ्या संख्येने शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.