संगमनेर प्रतिनिधी :- माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी {दि. ७} धांदरफळ बुद्रुक येथे सकाळी साडेनऊ वाजता अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. डॉ. सुधीर तांबे हे असतील. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, मालपाणी उद्योग समुहाचे संचालक डॉ. संजय मालपाणी आदी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, धांदरफळ बुद्रुक गावासाठी दिलेल्या योगदानाबद्दल श्रीमती यमुनाबाई मुरलीधर वलवे यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय सल्लागार मंडळाचे अध्यक्ष अरुण कडू आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक ह. भ. प. डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर यांच्या हस्ते हा सत्कार होणार आहे. यावेळी तालुक्यातील व शहरातील सर्व नागरिक बंधू- भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जि. प. सदस्य रामहरी कातोरे, उद्योजक बाळासाहेब देशमाने, भाऊसाहेब डेरे व संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
आ. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त ७ रोजी अभिष्टचिंतन सोहळा
Reviewed by Dainik Lokmanthan
on
23:22
Rating: 5