Breaking News

स्वच्छता निरोगी जीवनाचा पाया - चौधरी

शिकलेली माणसेही अंध्दश्रध्देच्या आहारी गेली आहेत़. शिक्षणातून चांगला समाज घडला पाहीजे़. प्रत्येकाने आपल्या घराबरोबर सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेसाठी पाऊल उचलले तर स्वच्छ व सुंदर भारताचे स्वप्न साकार होईल असे चौधरी महाराज यांनी सांगितले.


नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे म्हणाले की, चौधरी महाराजांनी संत गाडगे महाराज यांच्या कार्याचा वसा पुढे चालविला आहे़ राहुरी येथे चौधरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल असे तनपुरे यांनी सांगितले.़ मुख्याधिकारी नानासाहेब महानवार यांनी स्वच्छतेचे महत्व सांगितले़. कार्यक्रमास नगरसेवक सुर्यकांत भुजाडी, दिलीप चौधरी, सुनिल फडके, सुनिल कुमावत, आऱ. बी. ज़ाधव, आप्पा तनपुरे, सुधीर वैदय, सुनंदा दहातोंडे आदी उपस्थित होते़.