संत गाडगे बाबांचे विचार त्यांच्या सहकार्याकडून ऐकण्याची संधी राहुरीकरांना मिळाली़. बीडवरून नाशिककडे जातांना गाडगे बाबांचे सहकारी 83 वर्षीय जगन्नाथ चौधरी महाराज यांना राहुरी नगर परिषदेत मार्गदर्शन करण्याचे निमंत्रण नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी दिले़. चौधरी महाराजांच्या तोंडून गाडगे बाबांचे विचार ऐकून श्रोते मंत्रमुग्ध झाले़. स्वच्छता व व्यसनमुक्ती हा निरोधी जीवनाचा पाया असल्याचा संदेश त्यांनी दिला़ राहुरी नगर परिषदेच्या प्रांगणात नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी चौधरी महाराजांचे स्वागत केले़. संत गाडगे बाबांनी राज्य शासनाच्या आगोदर राहुरी येथे पहीली आदीवाशी शाळा सुरू केली याची आठवण चौधरी महाराज यांनी करून दिली़. राहुरीमध्येही गाडगे बाबांनी स्वच्छतेचा संदेश दिला. ़अशा राहुरी शहरात आल्यानंतर आपल्याला समाधान वाटल्याचे चौधरी महाराज यांनी सांगितले़.
संत गाडगे बाबांचे विचार ऐकून श्रोते मंत्रमुग्ध
Reviewed by Dainik Lokmanthan
on
11:15
Rating: 5