Breaking News

शेतकर्‍यांचा महावितरण अधिकार्‍यांच्या कार्यालयात ठिय्या

भागडा पाईप चारीचे कनेक्शन वीज थकबाकी भरूनही जोडून दिले जात नसल्याने शेतकर्‍यांनी महावितरण कार्यालयात ठिय्या मांडला. नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे व रावसाहेब खेवरे यांनी महावितरण अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. 

राहुरी येथील महावितरण विभागाच्या उपविभागीय कार्यालयात भागडा चारीवरील लाभार्थी शेतकर्‍यांनी मोठी गर्दी करीत ठिय्या मांडला होता. दरम्यान, नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे व शिवसेना उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी महावितरणच्या कार्यालयात उपस्थिती देत विज कनेक्शन जोडून देण्याची मागणी केली. ़विजेची थकबाकी नसतांना कुणाच्या दबावाखाली वीज जोडून देण्यास विलंब केला जातो, असा सवाल नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी केला़ तात्काळ विजेचे कनेक्शन जोडून देण्यात यावे अशी मागणी रावसाहेब खेवरे यांनी केली. भागडा पाईप चारीची थकीत आठ लाख रूपयांची रक्कम भरण्यात आली आहे़ रोटेशन केवळ दहा दिवस बाकी आहे़ पाईप चारीव्दारे तलाव भरण्यास विलंब झाल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होत असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. महावितरणचे उपअभियंता धिरज गायकवाड यांनी लवकरच वीज जोडणी केली जाईल अशी ग्वाही दिली़ यावेळी उपसरपंच विजय नरवडे, सुयोग नालकर, भाऊसाहेब आडभाई, सुधीर झांबरे, अनिल घाडगे, जयसिंग घाडगे आदी उपस्थीत होते़