Breaking News

राज्य उत्पादन शुल्क विभागासाठी ५ कोटींचा निधी माजीमंत्री आ. थोरात यांचा पुढाकार

संगमनेर प्रतिनिधी ;- संगमनेर शहराच्या वैभवात भर घालणारी सर्वसुविधांयुक्त विविध इमारती अशी राज्य उत्पादन शुल्क विभागाची कार्यालयीन इमारत लवकरच उभी राहू पाहत आहे. या विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातुन ५ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.


आ. थोरातांनी शहरात संगमनेर बायपास, प्रवरानदीवर मोठा पूल, जुन्या पुलास नवीन समांतर पूल, निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन, अद्यावत तहसील इमारत, प्रांत कार्यालय इमारत, नगरपालिका इमारत, पंचायत समिती इमारत, न्यायालय इमारत, कवी अनंत फंदी खुले नाट्य गृह, भव्य क्रिडा संकुल, शासकीय विश्रामगृह या वैभवशाली इमारती उभ्या केल्या आहेत. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यातून मॉडेलरुपी इमारती संगमनेरात होत आहेत. शहर व तालुक्यातील नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.