संगमनेर : तोंडाचा कर्करोग, विविध प्रकारच्या गाठी, आधुनिक इम्प्लांट, अपघातातील गंभीर स्वरुपाचे तोंडाचे, जबड्याचे फ्रॅक्चर, क्लिष्ट स्वरुपाच्या दुखापती आदींमुळे त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी एसएमबीटी दंत महाविद्यालय व रुग्णालयातील सीबीसीटी अर्थात ‘कोन बिम कम्प्युटराईज्ड टोमोग्राफी’ हे उपकरण अतिशय उपयुक्त ठरेल, असा विश्वास शासकीय दंत महाविद्यालयाचे प्रा. डॉ. हेमंत उमर यांनी व्यक्त केला. एसएमबीटी दंत महाविद्यालय व रुग्णालयात सुमारे १ कोटी रुपये खर्चाच्या ‘सीबीसीटी’चे लोकार्पण झाले. यावेळी प्रख्यात दंतरोग तज्ञ डॉ. अब्दुल हमीद, एसएमबीटी सेवाभावी संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. हर्षल तांबे आदी उपस्थित होते.