नवीन जिल्ह्याचे संगमनेर मुख्यालय करा : अॅड. होडगर
या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की काही दिवसांपूर्वी पालकमंत्री प्रा. राम शिंदे व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करण्याचे सूतोवाच केले होते. त्यामुळे लवकरच नगर जिल्हा विभाजनाचा निर्णय होणार असल्याने संगमनेरच्या जनतेने संगमनेर हे नवीन जिल्हाचे मुख्यालय करण्यासाठी आपआपल्या स्तरावर उठाव करावा. दरम्यान, शासनाच्या नवीन धोरणानुसार नवीन प्रस्तावित कॅनॉल हे बंदिस्त पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नवीन बंदिस्त कॅनॉल हे संगमनेर तालुक्यातील निमोण मार्गे घेण्यात यावा. कारण सध्या तळेगाव गटातील निमोन, नान्नज पारेगाव, सोनोशी, कर्हे, पारेगाव, चिंचोली गुरवचा काही भाग हा निळवंडे धरणापासून वंचित आहे. त्यामुळे तळेगाव गटाला निळवंडे धरणाच्या डाव्या कॅनॉलचा फारसा फायदा होत नाही. तर शिर्डीला बंदिस्त पिण्याची पाईपलाईन जाणार असल्याने त्यामध्ये तळेगाव गटाचाही समावेश सरकारने करावा.
