बेरोजगार युवकांची शासनाकडे हाक ; नोकर भरती करा
बेरोजगार युवकांनी आमदार कांबळे यांना शासकीय नोकरी भारतीसंदर्भात नुकतेच निवेदन देऊन त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याची विनंती केली आहे. त्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, शासन निर्णय दि. 23/06/2017 नुसार 23, 000 रिक्त पदांची भरती केंद्रीय पद्धतीने करावी, खाजगी संस्थेतील भरती अभियोग्यता गुणानुक्रमे शासनामार्फत करावी, 30% नोकर कपातीचा निर्णय रद्द करून जिल्हा पातळीवर सर्व जागा भराव्यात, महाराष्ट्रातील 1300 शाळा रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा, तसेच अभियोग्यता चाचणी एकाच वेळेस दोषमुक्त घेण्यात यावी. एमपीएससी डमी रॅकेट संबंधी सिबीआय चौकशी करावी, पोलीस भरतीच्या जागा वाढवण्यात याव्यात, शिक्षक, तलाठी, एमपीएससी, लिपिक, शिपाई भरतीच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात यासह विविध मागण्या युवकांनी शासनाकडे केल्या आहेत. यावेळी अमजद पठाण, गणेश हाळनोर, योगेश आरंगले, उणेश यादव, प्रमोद पंडित, कलीम शेख, दीपक कांगुणे, अशोक तासतोडे, पटारे मयूर, आकाश भद्रे, सिकंदर शेख, अक्षय आढाव, जाते गणेश, गाढे उमेश, रविंद्र अभंग, उमेश क्षीरसागर, प्रमोद शिंदे, पवार मोनिका, स्नेहल वडीतके,कैलास म्हस्के, अजय भागवत, अमोल पटारे, सोनाली अबुज, सिद्धी तापोळे, माधव कांबळे, धनंजय नाईक यांच्यासह यांच्यासह असंख्य युवक उपस्थित होते.
