Breaking News

शाखा अभियंता विजय बापट यांचा द्रविडी प्राणायाम चेष्टेचा विषय भंगार चोरीचा खुलास ठरला हास्यास्पद

मुंबई /विशेष प्रतिनिधी :- उच्च न्यायालय सेवा केंद्राच्या ऐंशी लाखाच्या भंगार चोरी प्रकरणात असलेला सहभाग लपविण्यासाठी शाखा अभियंता विजय बापट यांनी सुरू केलेला द्रविडी प्राणायाम सार्वजनिक बांधकाम विभागात चर्चेतून चेष्टेचा विषय ठरला आहे.साबांत मोठमोठे गैरव्यवहार चर्चेत असताना शाखा अभियंता सारख्या माणसाने भंगार तेही न्यायव्यवस्थेच्या आवारातले अपवाद सोडू नये ,हा नितीमत्तेचा लिलाव करण्याचा कळस ठरल्याचे बोलले जात आहे.

शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागात सन 2012 पासून अनेक गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे.अनेक कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यकाळात झालेल्या या गैरव्यवहाराची चर्चा आजही सुरू आहे.यातील अनेक गैरव्यवहारांची विभागीय चौकशीसह एसीबी आणि लोकांयुक्तांपर्यंत विविध पातळीवर चौकशीही सुरू आहे.जवळपास सर्वचप्रकरणे कंञाटदारांशी कार्यकारी अभियंत्यांशी असलेले संगनमत आणि त्यातून तीस टक्यांपर्यंत फोफावलेल्या लाचखोरीशी संबंधित आहे.ही मःडळी लाचखोरीत निर्ढावली असली तरी साबांच्या मालमत्तेची चोरी करण्यापर्यंत मजल मारण्याचे धाडस जानेवारी 2017 अखेर कुणी दाखवले नव्हते.ती उणीव भरून काढण्याचे काम शहर इलाखा विभागाच्या एका शाखा अभियंत्याने केल्याची चर्चा सार्वजनिक बांधकाम विभागात आहे.

शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत उच्च न्यायालय सेवा केंद्राच्या भंगार मालाची चोरी झाल्याचे दि.13 फेब्रूवारी 2017 रोजी साबां प्रशासनाच्या निदर्शनास आले.दि.11 व 12 फेब्रूवारी हे दोन्ही दिवस सुटी असल्याने दि.10 फेब्रूवारी रोजी क्लोजींग 13 फेब्रूवारीच्या ओपनिंगला जुळत नसल्याने शाखा कार्यालयाच्या कर्मचार्यांमध्ये अनामिक भिती निर्देशीत करणारी अस्वस्थता पसरली.या अस्वस्थतेतून भंगार मालाची शहनिशा सुरू झाली आणि तब्बल ऐंशी लाख रूपये किंमत असलेले भंगार गायब झाल्याचे स्पष्ट झाले.या संदर्भात स्थापत्य सहाय्यक तंञज्ञांनी तत्कालीन उपअभियंता,कार्यकारी अभियंता या आपल्या वरिष्ठांना सादर करून या भंगार मालाची चोरी झाली असा संशय व्यक्त केला.त्यानंतर काही दिवस हे प्रकरण शांत झाले.

या प्रकरणाच्या चर्चेचा ओघळ आ.चरणाभाऊ वाघमारे यांच्यापर्यंत पोहाचला आणि त्यांनी तात्काळ या प्रकरणाची चौकशी करून या शाखेत कार्यरत असलेल्या शाखा अभियंत्यांवर जबाबदारी निश्‍चित करावी.अशी मागणी केली.त्यानंतर शाखा अभियंता विजय बापट यांना कारणे दाखवा नोटीस बजाऊन खुलासा मागविण्यात आला.या कारणे दाखवि नोटीसला विजय बापट यांनी दिलेले उत्तर साबांत चर्चेला निमित्त ठरून विनोद मानला जात आहे.