Breaking News

संगीत, नृत्य आणि तांडव हे ईश्वराचे रूप ह. भ. प. वारे


उक्कलगांव प्रतिनिधी :- माणसाप्रमाणेच ईश्वराला संगीत, नृत्य, तांडव नृत्य आवडते. त्याप्रमाणे ईश्वराचे हे रूप आहे. याला महाशिवरात्रीनिमित्त असाधारण महत्व आहे, असे प्रतिपादन ह. भ. प. शिवाजी वारे महाराज पाथर्डीकर यांनी केले. ते म्हणाले, हरहर महादेवच्या शक्ती व भक्ती असल्याशिवाय परमात्मा दिसत नाही. ईश्वराची उपासना आताची गरज आहे. यावेळी बम्हेश्वर मिञ मंडळाचे अध्यक्ष गोरख थोरात, उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, रामेश्वर थोरात, रामदास रंधे, गोकूळ बोर्डे, संजय चव्हाण, सचिन भागवत, सचिन कर्डिले, दत्ता पावसे, बबन गोसावी, नितीन रंधे, आदींसह बम्हेश्वर मिञ मंडळाचे कार्यकर्त्यांसह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. उक्कलगावच्या भजनी मंडळाची साथ मिळाली. बम्हेश्वर मित्रमंडळाच्या खिचडी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.