विद्यार्थ्याची रेशिम उद्योगास भेट
सोनपेठ (प्रतिनिधी), दि. 24 - सोनपेठ येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने बी. एस्सी. च्या विद्यार्थ्यांना माहीती देण्यासाठी सोनपेठ तालुक्यातील सायखेडा येथील नरसिंग ऊत्तमराव सोपने यांच्या रेशिम उद्योग प्रकल्पाला विज्ञान शाखेच्या वतीने भेट देण्यात आली. व प्रकल्पाबातिची माहिती जाणुन घेण्यात आली. महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांच्या किटकशास्त्राच्या अभयासक्रमाचा एक भाग असलेला रेशीम उद्योग आपल्या परिसरात काही शेतकरी राबवतात, त्यांचा त्या प्रत्यक्ष अनुभवाचा व प्रात्याक्षिक पाहण्यासाठी लघु सहल आयोजित करण्यात येऊन प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रा.डॉ.रणखांब एस.व्ही व प्रा.व्ही.एस.मुलगीर यांच्यासह विद्यार्थ्यांनी भेट घेतली. यावेळी माहिती देण्यासाठी महविद्यालयाचा माजी विद्यार्थी केलस नरसिंगराव सोपने, राहुल विठ्ठल कोकाटे व साहेबराव आरसिडे हे होते. यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारून या प्रकल्पाबाबत जाणुन घेतले.
