Breaking News

अजिंक्यतारा किल्ल्याच्या रस्त्यासाठी 1 कोटी 46 लाखाचा निधी मंजूर

सातारा, दि. 8 (प्रतिनिधी) : सातारा शहराचा मानबिंदू असलेल्या ऐतिहासिक किल्ले अजिंक्यतारा येथे जाणार्‍या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. मराठ्यांच्या राजधानीत अतिशय गर्वाने उभा असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. मात्र, कि ल्ल्यावर जाण्याच्या रस्त्याची दुरावस्था झाल्याने पर्यटक आणि शिवप्रेमींमधुन रस्ता दुरुस्तीची सातत्याने मागणी होत होती. किल्यावर जाणार्‍या रस्त्याची तातडीने दुरुस्ती क रावी तसेच पथदिवे बसवण्यात यावेत, अशी आग्रही मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत केली होती. पथदिव्यांच्या कामास मंजूरी मिळून कामही सुरु करण्यात आले आहे. दरम्यान, नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी रस्त्याचा प्रश्‍न उपस्थित केला होता. त्या रस्त्याच्या कामासाठी 1 कोटी 46 लाख 53 हजार रुपये निधीस प्रशासकीय मंजूरी मिळाली. 


मराठ्यांची राजधानी म्हणून नावलौकिक असलेल्या सातारा शहराला अजिंक्यतारा कि ल्ल्यामुळे विशेष महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला पाहण्यासाठी दररोज असंख्य पर्यटक येत असतात. तसेच किल्ल्यावर दररोज नित्य नियमाने फिरण्यासाठी जाणार्‍या नागरिकांची संख्याही मोठी आहे. पर्यावरणप्रेमी नागरिक आ णि विविध ग्रुपमार्फत किल्ल्यावर वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, किल्ला परिसर स्वच्छता आदी उपक्रम सातत्याने राबवले जातात. शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमी संघटनांच्या माध्यमातून कि ल्ल्यावर छ. शाहू राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमप्रसंगी इ तिहासप्रेमी संघटना व नागरिकांनी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे रस्त्याची दुरुस्ती आणि सुरक्षिततेच्यादृष्टीने पथदिवे बसवण्याची मागणी केली होती. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी गोडोली, किल्ला प्रवेश कमानीपासून अजिंक्यतारा किल्ल्यावर जाणार्‍या रस्त्याची दुरुस्ती आणि पथदिवे बसवण्याबाबत जिल्हा नियोजन विकास आराखडा बैठकीत आवाज उठवून हे दोन्ही प्रश्‍न मार्गी लावण्याची आग्रही मागणी केली होती. यासंदर्भात त्यांनी पालकमंत्री ना. विजय शिवतारे, जिल्हाधिकारी यांच्याकडेही सातत्याने पाठपुरावा केला होता. 

जिल्हा नियोजन समितीतून पथदिव्यांसाठी तातडीने निधी मंजूर करण्यात आला होता. पथ दिवे बसवण्याचे कामही जोमाने सुरु आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांस्कृतीक कार्य विभागाच्या सचिवांची भेट घेवून या रस्त्यासाठी तातडीने निधी मंजूर करण्याची मागणी केली होती. गोडोली ते अजिंक्यतारा किल्ल्यावरील प्रवेशद्वार या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत तब्बल 1 कोटी 46 लाख 53 हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. या निधीमधून किल्ल्यावर जाणार्‍या 0/00 ते 3/640 या लांबीच्या रस्त्याची दुरुस्ती करणे आणि रस्त्याच्या कडेला संरक्षक भिंत बांधणे हे काम केले जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच झाला असून या कामास निधी उपलब्ध करुन देण्याच्या सुचना जिल्हाधिकार्‍यांना मिळाल्या होत्या. त्यामुळे अजिंक्यतारा किल्ल्यावर जाणार्‍या रस्त्याची दुरावस्था काही दिवसांतच दूर होणार असून हा रस्ता मजबूत आणि सुरक्षित होणार आहे. या कामाची तातडीने निविदा प्रक्रिया पुर्ण करुन त्वरीत कामास सुरुवात करावी तसेच काम दर्जेदार क रावे, अशा सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधीत विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या आहेत.