आवडीच्या क्षेत्रात उत्तम करीअर घडवा - कल्याण काळे
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक लहू कानडे, नवजीवन विद्यालयाचे प्रा. बापूसाहेब लोढे उपस्थित होते. यावेळी शाळेतील विद्यार्थिनी रोहिणी आगळे, अंकिता काळे, पल्लवी मेरड, मिनाज शेख, प्राजक्ता सावंत, प्रियांका लांडे, स्वाती खरड यांनी भाषणे केली. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेला झेरॅाक्स मशीन भेट म्हणून देण्यात आले. यावेळी विद्यालयाचे माजी प्राचार्य रमेश झिरपे, प्राचार्य कल्याणराव मडके, शिक्षक नानासाहेब काटे, रावसाहेब घनवट, माया मुळे, आबासाहेब वाघमारे, प्रकाश उगलमुगले, अमोल लोखंडे, प्रकाश पठारे, मुकुंद जमधडे , नानासाहेब खरड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुधाकर उगले यांनी तर सूत्रसंचालन प्रा. महादेव मासळकर यांनी केले. आभार प्रा. आबासाहेब वाघमारे यांनी मानले.
