महाराष्ट्रातील युवा स्पर्धकांना प्रोत्साहन देणारे स्टार महाराष्ट्र या डान्स् कॉम्पीटीशनमध्ये राहुरीतील ऋषिकेश गुरूनाथ सुबंध याची अंतीम फेरीत निवड झाली आहे.स्टार महाराष्ट्र, पुणे आयोजित डान्स स्पर्धेत महाराष्ट्रभरातून स्पर्धा घेवून निवडक स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत राहुरी तालुक्यातील सुपूत्र ऋषिकेश गुरूनाथ सुबंध याने प्रथम, द्वितीय व तृतीय राऊंडमध्ये यश मिळवत अंतीम फेरीत पदार्पण केले आहे. ही अंतीम फेरी दि. 25 फेब्रुवारी रोजी पुणे येथे होणार आहे. मिळालेल्या यशाबद्दल ऋषिकेशचे सर्वत्र कौतुक होत असून आज होणार्या अंतीम फेरीसाठी त्याला त्याच्या कुटूंबातील तसेच राहुरीतील नागरीकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
ज होणार्या स्टार महाराष्ट्रच्या अंतीम फेरीत राहुरीचा ऋषिकेश
Reviewed by Dainik Lokmanthan
on
10:30
Rating: 5